Monday, 3 October 2022
2 ऑक्टोबर रोजी सरोदेवस्ती शाळेत अवतरले राष्ट्रपिता म.गांधी , लाल बहादूर शास्त्री व क्रांतिकारक
आज जि प प्राथमिक शाळा सरोदेवस्ती येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली यानिमित्ताने शाळेत वेषभूषा स्पर्धा आयोजित केली होती सर्व विद्यार्थ्यांनी विविध महान नेते, देशभक्त, क्रांतिकारक यांच्या वेषभूषा साकारल्या आहेत तसेच नवराञी निमित्ताने मुलींनी नवदुर्गा वेषभूषा साकारल्या आहेत. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रूपाली राऊत व श्रीमती पोतदार मॅडम यांनी विस्तार अधिकारी मा.उज्वला गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी केला.
नवरात्रीनिमित्त विविध उपक्रम साजरे:-
नवरात्रीचे नवदुर्गांची नऊ रूपे अवतरली वडगाव तनपुरा शाळेत :-
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव तनपुरा येथे *नवरात्रीनिमित्त नवरात्रीची नऊ रूपे तू.... आधुनिक युगातील नवदुर्गा* हा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींनी अनेक वेशभूषा साकारल्या होत्या. आधुनिक काळातील स्त्रीची विविध रूपे मुलींनी साकारली होती. या कार्यक्रमाला माता पालक, ग्रामस्थ तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरला मोढवे व श्रीमती भापकर मॅडम यांनी विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी केला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेहेकुरी या ठिकाणी आधुनिक युगातील नवदुर्गा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कर्जत बीटच्या सन्माननीय विस्तार अधिकारी श्रीमती गायकवाड मॅडम गावचे सरपंच गणेश गायकवाड शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश मांडगे ग्रामसेवक गदादे भाऊसाहेब कृषी अधिकारी शेळके मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी श्रीमती गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेत राबवत असणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक केले हा कार्यक्रम संपूर्ण विद्यार्थ्यांनी आयोजित केला असल्याने सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री सचिन लोंढे व सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली.नवरात्रीनिमित्त मिरजगाव मुली शाळेत दांडिया
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली येथे नवरात्रीनिमित्त दांडिया आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सर्व मुलींनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला.
शाळा डिजिटल करण्यासाठी माजी विद्यार्थी सरसावले जिल्हा परिषद शाळा,कोंभळी येथे 2001 च्या इयत्ता चौथीच्या माजी विदयार्थी यांची त्यांच्या वर्गशिक्षिका सातपुते मॅडम ज्या आता शाळेत मुख्याध्यापिका आहेत त्यांनी माजी विद्यार्थी यांची ऑनलाईन मीटिंग ३ मे रोजी घेतली व विद्यार्थी यांना शाळेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले सर्व विद्यार्थी यांनी ताबडतोब मान्य करून तशी मदत करण्यासाठी त्यांचे व्हाट्सप्प ग्रुप वर मेसेज केला व थोड्याच काळात 30000 रुपये माजी विद्यार्थी यांनी जमा केले व आपली शाळा डिजिटल करण्यासाठी one plus चे 32 इंच चे दोन led tv संच 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त शाळेस भेट दिले ........ग्रामीण भागातील आपल्या शाळेचे ऋण फेडण्याची संधी दिल्या बद्दल माजी विद्यार्थी यांनी आपल्या वर्गशिक्षिका सातपुते मॅडम यांचे आभार मानले ..........
Sunday, 25 September 2022
पोषण माह निमित्त कर्जत तालुक्यात उपक्रम व जनजागृती सुरूच.
पोषण माह निमित्त विविध शाळांमधून संतुलित आहार व पोषणाचे महत्व याबाबत जागृती करण्यासाठी उपक्रम सुरूच आहे. काही प्रातिनिधिक क्षणचित्रे. केंद्र थेरगाव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी
पोषण आहार माह
पोषण आहार माह : केंद्र- खेड
राऊतवाडी शिंपोरे जुने
खेड केंद्रातील विविध शाळांमध्ये पोषण आहार माह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये पोषण आहार शपथ, आहारातील पौष्ठिक अन्नपदार्थांचे प्रदर्शन, रांगोळी, आहारविषयक जनजागृती मेळावे, माता-पालक सभा, शिक्षक-पालक सभा, तज्ञ मार्गदर्शन इ. उपक्रमांचे आयोजन केंद्रातील शाळांमध्ये करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी श्रीम. मीना शिवगुंडे मॅडम, शिक्षण विस्तारअधिकारी श्रीम. शकुंतला निंबाळकर मॅडम, खेड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.सुधाकर गाडे सर यांनी शाळांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले.
शिंपोरे नवे आगवणतळ
Wednesday, 21 September 2022
Monday, 19 September 2022
शिक्षक दिन : कर्जत तालुक्याचा सन्मान
जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार मागील दोन वर्षांचे व चालू असे तीन पुरस्कार महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मा. दिनकर टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त शिक्षक :
2020 :- श्री. विजय राऊत सर, शाळा नागलवाडी केंद्र मिरजगाव
2021:- श्रीम. उज्वला गायकवाड-तिखे, शाळा तिखी केंद्र मिरजगाव
2022 :- श्री.नवनाथ दिवटे (आण्णा), शाळा माळवदेवस्ती, केंद्र पिंपळवाडी
![]() |
| पुरस्कार वितरण प्रसंगी कर्जत तालुक्यातील पुरस्कारप्राप्त तिघे शिक्षक बांधव व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले कर्जत तालुक्यातील शिक्षक बांधव. |
पोषण माह निमित्त कर्जत मध्ये उपक्रमांची रेलचेल
कर्जत तालुक्यातील प्रत्येक शाळेवर पोषण माह निमित्त अनेक नानाविध उपक्रमांची रेलचेल सुरु असून सर्व कार्यक्रमांना प्रसिद्धी देणे शक्य नसले तरी काही प्रातिनिधिक क्षणचित्रे.
![]() |
| शाळा देमनवाडी |
![]() |
| शाळा सरोदेवस्ती |
![]() |
| शाळा रेहेकुरी |
![]() |
| शाळा निमगाव गांगर्डा |
![]() |
| चापडगाव |
![]() |
| शाळा गाडेवाडी |
![]() |
| शाळा देशमुखवाडी |
![]() |
| शाळा बुवासाहेबनगर |
![]() |
| पोषणआहार कुंभ शाळा बुवासाहेबनगर |
![]() |
| शाळा सिद्धटेक |
![]() |
| याच आमच्या गौरी (लक्ष्मी)आणि हाच त्याच्यासाठी आहार(भोजन) : अनारसेवस्ती |
भारतीय शिक्षण प्रणालीत धोरणात्मक बदलाची गरज, नवीन प्रवाह.
शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाह तसेच नवीन शैक्षणिक धोरण इतर देशातील शिक्षणातील प्रवाह भारतीय शिक्षण व्यवस्थेचे टीकात्मक परीक्षण सर्व बाबींचे उत्तम विश्लेषण विवेक सावंत यांनी केले आहे. अत्यंत छान असा व्हिडिओ.
Subscribe to:
Posts (Atom)









.jpeg)

















