नवरात्रीचे नवदुर्गांची नऊ रूपे अवतरली वडगाव तनपुरा शाळेत :-
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव तनपुरा येथे *नवरात्रीनिमित्त नवरात्रीची नऊ रूपे तू.... आधुनिक युगातील नवदुर्गा* हा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींनी अनेक वेशभूषा साकारल्या होत्या. आधुनिक काळातील स्त्रीची विविध रूपे मुलींनी साकारली होती. या कार्यक्रमाला माता पालक, ग्रामस्थ तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरला मोढवे व श्रीमती भापकर मॅडम यांनी विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी केला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेहेकुरी या ठिकाणी आधुनिक युगातील नवदुर्गा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कर्जत बीटच्या सन्माननीय विस्तार अधिकारी श्रीमती गायकवाड मॅडम गावचे सरपंच गणेश गायकवाड शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश मांडगे ग्रामसेवक गदादे भाऊसाहेब कृषी अधिकारी शेळके मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी श्रीमती गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेत राबवत असणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक केले हा कार्यक्रम संपूर्ण विद्यार्थ्यांनी आयोजित केला असल्याने सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री सचिन लोंढे व सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली.

No comments:
Post a Comment