आमच्या विषयी

   कर्जत पंचायत समितीच्या वतीने तमाम कर्जतकर विद्यार्थी, शिक्षक, नागरिक व या संकेतस्थळाच्या सर्व वाचकांसाठी हे खुले व्यासपीठ निर्माण करत आहोत. aaplekarjat.blogspot.com या पत्त्यावर आपण वाचक, लेखक, संकलक व कल्पक लोकांना अनुभवू, वाचू, ऐकू शकाल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आशिष येरेकर साहेब, शिक्षणाधिकारी प्राथ. मा. भास्कर पाटील साहेब, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे मॅडम यांच्या प्रेरणेतून या संकेतस्थळाची निर्मिती होत आहे. वाचकांसाठी हे संकेतस्थळ खुले करताना अतिशय आनंद होत आहे. या संकेतस्थळावर आपणास विविध लेख, निबंध, मनोगते, कथा, कविता, समीक्षणे, विवेचने, कोडी, म्हणी, बोली भाषेतील शब्द, चित्रे, विविध उपक्रम, सुविचार, विविध घडामोडी, यशोगाथा आणि अजून बरेचकाही पहावयास मिळणार आहे. आपणही या संकेतस्थळासाठी  लेखन करून सक्रीय सहभाग नोंदवू शकता. चला तर मग, आपण आपल्याच लोकांनी आपल्याचसाठी निर्माण केलेल्या या व्यासपीठाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया व या व्यासपीठाचा पुरेपूर लाभ उठवून इतरांना प्रेरित करुया.


संपादन मंडळ :

मा. मीनाताई शिवगुंडे,  गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कर्जत.

मा. देवराम लगड  विस्तार, अधिकारी शिक्षण पंचायत समिती कर्जत.

मा. उज्ज्वला गायकवाड,  विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती कर्जत.

मा. शकुंतला निंबाळकर, विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती कर्जत.

डॉ. बाबासाहेब पवार, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथ, शाळा मिरजगाव मुली.

श्री. रवींद्र राऊत, उपाध्यापक, जि.प.प्रा शाळा देमनवाडी, ता. कर्जत

श्री. सोमनाथ गोपाळघरे, डाटा एन्ट्री ऑपरेटर, पंचायत समिती कर्जत.

श्री. नितीन गारुडकर, उपाध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैदानवाडी, ता. कर्जत

श्री. आदिक बचाटे, उपाध्याप्क, जिल्हा परीहाड प्राथमिक शाळा कोंभळी, ता. कर्जत

श्रीम. जयश्री पोपट उकिर्डे, उपाध्यापक, जि.प.प्राथ.शाळा धनगरवाडी (थेरगाव), ता. कर्जत

No comments:

Post a Comment