🚆🚆🌴🌲 *NEW ASHTI* *TO*
*SOLAPURWADI........* 🌲🌴🚆 🚆
*नुकतीच जि . प . प्राथ. शाळा सुपे, गोयकरवाडी आणि जगताप वस्ती या शाळांची एक दिवसाची शै . सहल आयोजित करण्यात आली . यामध्ये प्रमुख आकर्षण होते ते🚆🚆🚆🚆 रेल्वे प्रवासाचे . आता पर्यंत विद्यार्थ्यांनी गाण्यात, टिव्हीत आगगाडीचा अनुभव घेतला होता परंतु या सहलीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आगगाडीत 35 किमी चा ( 45 मिनिट )प्रवास केला .🚆🚆🚆🚆 न्यू आष्टी ते सोलापूरवाडी . या मार्गात त्यांनी कडा व धानोरा स्टेशन पाहिले . प्रवास करताना मुलांनी पळणारी झाडे, शेती, ओढे ... इ . अनुभवले .🌴🌴🌲🌲🎄 स्टेशनवर सुरुवातीला जवळ येणारी आगगाडी पाहून जीव मुठीत धरणारी मुले आगगाडीच्या डब्यात केव्हा नाचू, खेळू लागली कळलेच नाही .प्रत्यक्ष आगगाडी सुरु झाल्यावर मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता . आगगाडीचा आवाज,पळणारी झाडे, आगगाडीतील सुख सुविधा पाहून मुले थक्क झाली . आगगाडीच्या डब्यात मुलांनी नाचून, गाऊन खूप आनंद उपभोगला . त्यांच्या चेह-यावरील आनंद कोणत्याही एककाने न मोजता येणारा होता . सोलापूरवाडीत आगगाडीतून मुलांना उतरावेशेच वाटत नव्हते . शेवटी त्यांनी जड अंतःकरणाने आगगाडीला बाय बाय केला .*
🚆🚆 *एरवी एस . टी . ने प्रवास केल्यानंतर प्रवास संपल्यावर लगेच तिकीट टाकून देणारी मुले जीवनात पहिल्यांदाच आगगाडीचा प्रवास केल्याने ते तिकीट मात्र जिवापाड जपताना दिसली .*⬜⬜⬜
🕌🕌 *श्री . शेख महंमद महाराज - वायरा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्याठिकाणी मुलांनी दुपारच्या जेवणाचा मनमुराद आनंद लुटला . प्रवासा दरम्यान एक गोष्ट लक्षात आली की चार भिंतीच्या बाहेर पडल्यावर मुलं व्यक्त होतात . कारण सकाळ पासूनच मुलं अगदी मन मोकळ्या गप्पा मारताना दिसले . आगगाडीत बसायचंय म्हणून मला झोपचं आली नाही, मी सगळ्यात अगोदर उठले, मी आईला स्वयंपाक करू लागले, ... इ . प्रकारे मुलं मनमोकळेपणाने व्यक्त होत होती . वर्गात प्रश्नांची उत्तरे न देणारी मुले प्रवासात मात्र गाणी, गोष्टी, कोडी ... इ . मध्ये मन मोकळ्या पणाने व्यक्त होत होती .*
🛥️🛥️ *प्रवास सिना धरणाजवळ येऊन लागल्याने धरणाच्या गप्पा सुरु झाल्या . नदीचे नाव, गावाचे नाव, धरणाचे फायदे .. इ माहिती मुलांना देत असताना अचानक एका प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . वर्गात मितभाषी असणाऱ्या मुलाने सर, धरण म्हणजे काय हो?🛳️🛳️🚢 हा लक्षवेधी प्रश्न विचारला . सर्वांच्या नजरा त्या मुलाकडे खेळल्या . कारण त्याची जिज्ञासूवृत्ती जागी झाली . खरोखरचं चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण मुलांना व्यक्त होण्यास किती लाभदायक ठरू शकतं हे यातून कळलं . एक प्रकारे या शै . सहलीची ही अध्ययन निष्पत्तीच म्हणावी लागेल . काही क्षणातच धरण समोर पाहून त्या जिसासू मुलाच्या प्रश्नाचे उत्तर त्याला आपोआपच मिळाले हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते . सर्व मुले त्याच्याकडे समाधानाने पाहत होती .*🚢🚢⛴️🛥️
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕 *निमगाव गांगर्डा -सिना धरणाचे अथांग पाणी पाहून मुले थक्क झाली . समुद्र (सागर ), नदी, धरण, बंधारा, कालवा या संकल्पना मुलांच्या याठिकाणी दृढ झाल्या . मुलांना आता वेध लागले होते ते बाबांचे . मांदळी या ठिकाणी मुलांनी श्री आत्मारामगिरी बाबा यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला . यादरम्यान मुलांना जीवनातील अतिशय मौल्यवान अशी गोष्ट शिकण्यास मिळाली . ती म्हणजे स्वच्छता . प्रसाद घेण्यापूर्वी मुलांनी भोजनासाठी जे पात्र घेतले त्याची स्वच्छता आणि आपण प्रसाद घेतल्यावर त्याही पेक्षा स्वच्छ करून कसे ठेवले पाहिजे हे मूल्य मुलांनी येथे आत्मसात केले .*🌡️🌡️🧹🧹🧹🚿🚿🚿🚰🚰
*प्रवासाचा आनंद मुले ज्या पद्धतीने घेत होती त्यामुळे त्यांना प्रवास संपूच नये असे वाटत होते . घरच्या प्रवासाला लागताना मुलांची एकच भावना होती कधी एकदा घरी जाईल आणि केलेली मज्जा घरच्यांना सांगेन !!!*🕵️♀️👩🌾
🚆🚆 *मुलांनी सहलीचे अनुभव घरी कथन केल्यावर पालकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या . आजी - आजोबा तर म्हणाले आमची हयात गेली पण आगगाडीत बसायचे सोडा पण साधी प्रत्यक्ष डोळ्यांनीही कधी रेल्वे पाहिली नाही . हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांत शाळेविषयी वेगळीच आपुलकी जाणवत होती याचे फार मनाला समाधान वाटले .*🛣️🛤️
🙏🙏 *शै . सहलीच्या निमित्ताने जे वाटले, जे अनुभवले, जे मुलांकडून शिकायला मिळाले ते आपणासमोर व्यक्त करावेसे वाटले . धन्यवाद .*🙏🙏
🖊️ *शब्दांकन*🖊️
🙏 *श्री . खराडे अशोक कारभारी* *उपाध्यापक - जि . प . प्राथ.शाळा गोयकरवाडी केंद्र - बहिरोबावाडी ता . कर्जत जि. अहमदनगर*🙏



No comments:
Post a Comment