आज दि १६ सप्टेंबर २०२२ रोजी जि प प्रा शाळा माळवदेवस्ती येथील शाळेत पोषण आहार माह उपक्रम अंतर्गत पिंपळवाडी अंतर्गत सर्व अंगणवाडी ताई, पालक, SMC अध्यक्ष व सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वेगवेगळया भाज्या, फळे, तयार केलेले पदार्थ, अंडी, मका, केळी, कांदा, कोंथबीर, कडीपत्ता, लिंबू,कडधान्य इत्यादींची मांडणी योग्य पद्धतीने करून पोषण आहाराची प्रतिज्ञा घेण्यात आली. यानंतर सौ ताराताई निक्षे, अश्विनी पंडीत ताई व श्री दिवटे सर यांनी पालेभाज्या, कडधान्य , फळे, अंडी, लिंबू मका व इतर मांडणी केलेल्या सर्व पदार्थांचे आहारातील महत्त्व आपल्या मनोगतामधून सांगितले. शाळेच्या वतीने उपस्थित सर्व अंगणवाडी ताईंचा श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आमच्या शाळेतील परसबागेत लावलेल्या शेवगा, लिंबुनी, कडीपत्ता, जांभुळ, पेरू, चिंच, आवळा, चेरी, वांगी, भोपळा, कलिंगड, टोमॅटो, पपई, अंजीर, घेवडा, मिरची, दोडका, चवळी, मेथी, कोंथबीर या सारख्या पालेभाज्या व फळभाज्या यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तेथे नेऊन देण्यात आली. परसबागेतील छोटया लागलेल्या कलिंगडाकडे विद्यार्थी कुतुहलाने पाहत होते. उपस्थित सर्वांचे आभार श्री राहिंज सर यांनी मानले.
No comments:
Post a Comment