धनगरवाडी (केंद्र थेरगाव) शाळेचे विद्यार्थी सीना धरण येथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेताना:-
धनगरवाडी शाळेची शिवारफेरी अहमदनगर जिल्ह्याची दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या सीना धरणावर बांधलेल्या सीना धरणावर आयोजित करून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यात आले. यानंतर निमगाव गांगर्डा शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्रित अल्पोपहार घेतला व अध्ययन अनुभवांची देवाणघेवाण केली.
रेहेकुरी शाळेचे विद्यार्थी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह थेट अभयारण्यात :-
![]() |
| रेहेकुरी शाळेच्या विद्यार्थ्यांना अभयारण्य व वन्यजीवांची माहिती प्रत्यक्ष फिरून दाखवताना वन विभागाचे कर्मचारी |
वन्यजीव सप्ताह अंतर्गत आज दिनांक 06/10/2022 रोजी जि प प्राथ शाळा रेहेकुरी शाळेने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी MFD खराडे साहेब यांनी विद्यार्थांना नाष्ट्याची व्यवस्था केली तसेच २ेहेकुरी काळवीट अभयारण्याबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच या ठिकाणी कर्जतचे जेष्ठ पत्रकार गणेश जेवरे साहेब उपस्थित त्यांनी ही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले . त्यानंतर विद्यार्थानी प्रत्यक्ष निरीक्षण मनोऱ्यावरून काळवीट हा देखणा प्राणी पाहिला एकंदर आजचा दिवस मुलांसाठी प्रत्यक्ष अनुभूती देणारा ठरला. वनविभाग रेहेकुरी सर्व स्टाफचे खूप खूप धन्यवाद.



No comments:
Post a Comment