जि प प्रा शाळा कानगुडवाडी येथे दि १६ सप्टेंबर २०२२ रोजी शाळेत पोषण आहार माह उपक्रम पालक,SMC अध्यक्ष व सदस्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी विविध फळे,भाज्या , अंडी, मका, केळी, कांदा, कोंथबीर,शेपू कडीपत्ता, लिंबू,कडधान्य ,तृण धान्य इत्यादींची कलात्मक पध्दतीने मांडणी करून पोषण आहाराची प्रतिज्ञा घेण्यात आली. यानंतर मुख्याध्यापिका श्रीम. शबाना सय्यद मॅडम यांनी फळे,दूध,अंडी, पालेभाज्या, कडधान्य ,फळभाज्या, यांचे आपल्या आहारातील महत्त्व सांगितले.तसेच सर्व कडधान्य ,भाज्या प्रत्यक्ष मुलांना दाखवून पोषक घटकांची माहिती दिली. उपस्थित सर्व माता पालकांचे आभार श्रीम. वंदना दुधे मॅडम यांनी मानले. शाळेत पोषण आहार माह उपक्रम अंतर्गत माता पालकांनी स्वतः तयार करून आणलेल्या पदार्थांचा आस्वाद सर्व मुलांना देण्यात आला.

.jpeg)
No comments:
Post a Comment