फिक्स्ड:- मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश
लेखक:-शंतनु गुहा रॉय
अनुवाद:-मुकेश माचकर
शंतनु गुहा रॉय हे पत्रकार आहेत. तीन दशकाहून अधिक काळ शोध पत्रकारितेत काम केले आहे. बातम्या पलीकडचे वास्तवाचे दर्शन घडवणारे लेखन करण्याबाबत त्यांचा हातखंडा आहे. असं म्हणतात की “ Facts Are Stranger Than Fiction” क्रिकेट जगतात सुरू असणाऱ्या मॅच फिक्सिंग, बेटिंगबाबत या पुस्तकात ओघवल्या शैलीत वर्णन केले आहे. क्रिकेटपटूं नाही आपल्या कार्यक्षेत्रात वर्तवणूक नियम बंधनकारक असतात आणि ते पाळले नाहीत म्हणून अनेक क्रिकेटपटूंवर क्रिकेट खेळण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. याचे वास्तव चित्रण लेखकाने या पुस्तकात उभं केल आहे. यामध्ये भारतीय,पाकिस्तानी,युरोपिय देशांतील खेळाडूंचाही समावेश आहे.
पुस्तकातील आवडलेला परिच्छेद फुटबॉल मधल्या जगतिक बेटिंगवर लक्ष ठेवण्यासाठी फिफा ही संघटना इंटरपोल बरोबर दहा वर्षाचा करार करू शकते तर आयसीसी तो का करू शकत नाही? या खेळीच्या प्रत्येक थरात भ्रष्टाचार शिरला आहे, असा इशारा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दिल्याने इंटरपोलने मदतीची तयारी दर्शवली, त्यावेळी बोर्डाने तपासाला परवानगी दिली असती तर आतापर्यंत हा खेळ अधिक स्वच्छ बनला असता.
पुस्तकातील बलस्थाने
पुस्तकातील दिलेले तपशील वास्तव व निर्भिडपणे दिले आहेत. सर्व घटना ओघवत्या शैलीत असल्यामुळे अत्यंत वाचनीय वाटले.
वरवर दिसणारे बेटिंग व त्याची पाळेमुळे खूप खोलवर गेले असल्याबाबतचे अनेक धक्कादायक खुलासे खूप थारारकपणे मांडण्यात आले आहेत. जसे पाकिस्तानी प्रशिक्षक बॉब खुत्भर यांची हत्या, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हॅन्सी क्रोनिया हत्या, सुनंदा वुपकर यांचा गुढ मृत्यू.
क्रिकेट हा खेळ आहे आणि तो खेळ निखळ खेळच राहावा ही लेखकाने व्यक्त केलेली अपेक्षा यथार्थ आहे.
T 20 कमी वेळेचा खेळ असल्यामुळे क्रिकेटचा दर्जा खालावत असल्याबाबत लेखकाने खंत व्यक्त केली आहे.
उणीवा:-
पुस्तकांमध्ये अनेक व्यक्ती, अनेक प्रसंग हाताळले गेले असल्यामुळे त्यामध्ये सुसंगतता लक्षात येण्यास खूप वेळ लागतो.
भारतीय खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन याच्यावर बेटिंग प्रकरणी आजीवन बंदी घातली याबाबत संपूर्ण पुस्तकात कुठेही उल्लेख आढळत नाही.
एकूणच पुस्तक अतिशय वाचनीय आहे. सर्व घटना सत्य असल्याने एकदा हे पुस्तक सर्वांनी वाचावे.
वाचक : श्रीमती मीना शिवगुंडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कर्जत.
No comments:
Post a Comment