एक होता कार्व्हर
मी वाचलेले पुस्तक एक होता कार्व्हर हे असून पुस्तकाची लेखिका वीणा गवाणकर ह्या आहेत .पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जॉर्ज कार्व्हर अतिशय शोधक नजरेने दुर्बिणीतून पाहत असतानाचे छायाचित्र आहे. त्याचं चित्राखाली मानवी मनाच्या खोल कप्प्यात रुजलेलं बी कसे अंकुरते याचं बोलकं चित्र आहे.
तसेच मल पृष्ठावर हे पुस्तक का वाचावे ? याविषयी लेखिकेने अतिशय मार्मिक शब्दात माहिती दिली आहे. हे पुस्तक आमच्या शालेय ग्रंथालयात उपलब्ध असून त्याचे मूल्य 250 रुपये आहे. राजहंस प्रकाशन निर्मित एक होता कार्व्हर हे पुस्तक लिहिण्याची स्फूर्ती लेखिकेला अवांतर वाचनातून मिळाली त्यासाठी लेखिकेने अनेक संदर्भ ग्रंथाचे वाचन केले त्यात Holt च Gerorge. W.Carver आणि G.Clerk च The man Who Talks with the Flower. याचा समावेश होतो. अतिशय शोधक वृत्तीने दहा-दहा तास बैठक मारून या पुस्तकाचे टिपणे काढण्यात आली.जॉर्ज कार्व्हर या व्यक्तिमत्त्वाने अतिशय भारावून गेलेल्या लेखिकेला सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कार्व्हर ने झपाटून टाकले होते. याच प्रतिभेने झपाटून लेखिकेच्या अतिशय, सरळ, सोप्या, सुलभ शब्दांनी गुंफलेल्या या पुस्तकाची निर्मिती झाली.
1860 च्या काळात एका निग्रो, गुलाम कुटुंबात मेरीच्या पोटी जन्मलेला अतिशय कृश मुलगा. अमेरिकेतील मिसुरी राज्यातील डायमंड ग्रुप पाड्यावर मोजेस कार्व्हर व सुजानबाई या जर्मन कुटुंबाने त्याच्या आईसह गुलाम म्हणून 700 डॉलरला खरेदी केला होता. 1862 मध्ये त्याची आई मेरी हिला पळून नेण्यात आलं त्याच्या बहिणीलाही मारून टाकण्यात आलं. ज्याची जगण्याची ही शाश्वती नव्हती अशा या अशक्त ,मुक्या, पोरक्या मुलाला सुजाण बाईंनी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जगवलं.
हा जिम मोजेस बाबाच्या गुराची, बागेची, परसाची देखभाल करी. तो ते काम इतक्या उत्कृष्टपणे करी की कोणीही त्याच्या बागेचे कौतुक करी. रानातली झाडझुडपं ,पक्षांची पिल्ले ,डबक्यातले छोटे मासे एवढेच त्याचे नातेवाईक होते. तो तासन तास झाडात रमत असे. त्याची चित्रकला ही उत्तम होती निसर्गातील वस्तूचे चित्र काढताना तो इतका रमून जाई की अगदी हुबेहूब चित्र तो काढीत असे.
थोडा मोठा झाल्यानंतर जिमने डायमंड ग्रो सोडून दिलं आणि तो जॉर्ज या नावाने ओळखू लागला. पुढील जीवन प्रवासात त्याला यायगर बाबा, म्यूलर बाई ,जॉर्ज मार्टिन, पेन बाई ,लुसी सिमर यासारख्या अनेक व्यक्तींचा सहभाग लाभला. या सहवासात या सर्वांनी त्याच्या अंगातील कलागुण हेरले.
त्याला प्राथमिक शिक्षणासाठी निओशी या निग्रो शाळेत पाठवण्यात आले. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी शिवणकाम, विणकाम, चित्रकला, संगीत, बायबल वाचणे, अंगण झाडणे, बागेची मशागत करणे, कपड्याची धुलाई करणे, स्वयंपाक करणे, कपडे इस्त्री करणे, गोष्ट कथन करणे, नक्कल करणे, गटार खणणे, हमाली, सुतारी, लोहारी करणे, अशी अनेक कामे तो कुशलतेने करत असे. पुढील उच्च शिक्षणासाठी मिलीया पॅलेस मध्ये जॉर्ज कार्व्हर ने प्रवेश घेतला. परंतु तेथेही त्याला कटू अनुभव आला. गोऱ्या कातडीच्या लोकांनी एका कृष्ण वर्णाच्या माणसाला पकडून आगीच्या ज्वालेत लोटून दिलं. हे पाहून तो मोठा दुःखी झाला. त्याची वर्णभेदाची जाणीव अधिक तीव्र झाली. अशाही परिस्थितीत पडेल ते काम करून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले.
उच्च दर्जाची पदवी असूनही विद्यापीठीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी sipsan कॉलेज येथेही कार्व्हर ला केवळ कृष्णवर्णीय असल्यामुळे नाकारण्यात आले. आशा या प्रतिभाषाली ,बुद्धिमान ,हरहुन्नरी कार्व्हर चे पुढील शिक्षण आयोगा स्टेट कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र व कृषी शास्त्र याचा अभ्यास करण्यासाठी झाली .प्राध्यापक विल्सन यांच्या ऑफिसमध्ये अभ्यास करण्यासाठी एका कॉट इतकी जागा त्याला मिळाली .
आत्मनिर्भर ,प्रगलभ्य ,धीर -गंभीर स्वभावचा , विनम्र विद्यार्थी .त्याच्या याका नावाच्या दुर्मिळ वनस्पतीच्या चित्राची निवड शिकागोत भरणाऱ्या वर्ल्ड कोलंबन एक्झिबिशन साठी झाली. मायकोलॉजीच्या अभ्यासासाठी वनस्पतीचे सुमारे वीस हजार नमुने त्याने गोळा केले.M.S ही उच्च पदवी त्याने संपादन केली.1865 मध्ये गुलामगिरी नष्ट करण्यात आली. परंतु जगण्यासाठी काय करावं लागतं हेच त्या निग्रो लोकांना माहीत नव्हतं अशावेळी 1881 मध्ये वॉशिंग्टन ट स्किगी मध्ये निग्रो मुलांसाठी पहिली शाळा कर्व्हरणे काढली. या शाळेत त्यांनी मुळाक्षराबरोबर धंदे शिक्षणाचे पाठ गिरवायला विद्यार्थ्यांना शिकवले. सुतार काम ,कुंभारकाम ,गाद्या तयार करणे, चपला शिवने, विटा भाजणे आत्मोंती बरोबर समाज उन्नती ही साधावी या उदात्त ध्येयावर त्यांनी ही शाळा उभारली होती. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत हार वर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना सन्माननीय डॉक्टर रेट देऊन गौरव केला.
उत्तम वकृत्व शैली, हाडाचे शिक्षण तज्ञ म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.1886 सली विनाशाच्या गर्देकडे वेगाने खेचल्या जाणाऱ्या आलाबामाला वाचवण्यासाठी डॉक्टर बुकर. टी .वॉशिंग्टन यांनी आयोगातील जॉर्ज कारवारला पत्र लिहिलं अतिशय सदन आयुष्य जगत असतानाही उच्च पद ,कीर्ती या सर्वांचा त्याग करून कार्व्हर त्या शतकानू शतक दारिद्र्याने गांजलेल्या गुलामीच्या विळख्यात रुतलेल्या दलितांच्या उद्धारासाठी आलाबामा मध्ये आले. तेथे त्यांनी अक्षरशः विद्यार्थ्यांकडून टाकाऊ वस्तु गोळा करून घेतल्या आणि प्रयोगशाळा अद्यावत केली .तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करून कापूस वेचणीनंतर उरणार्या नुसत्या झाडाच्या बुंध्या- फांद्याच्या तंतू पासून कागद ,लोखंड, घोंगड्या बनवून प्रदर्शन भरवले. भेंडी सारख्या निरुपयोगी म्हणून टाकाऊ ठरलेल्या वनस्पतीच्या तंतूपासून रग ,घोंगड्या तसेच टोमॅटो हे विषारी फळ आहे अशी शेतकऱ्याची धारणा असताना देखील त्याचे निरनिराळे खाद्यपदार्थ तयार करून प्रदर्शन भरवले. मृदू स्वभाव, विनयशिल वृत्ती, आजोड कर्तुत्वाने गावकऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केले .प्रत्येक आजारावर निरनिराळ्या जीवनसत्वयुक्त मुळ्यांच सार काढून कार्व्हर लोकांना प्यायला देऊन त्यांचे आजार नीट करत त्यामुळे त्यांना गावकऱ्यांनी डॉक्टरेट ही पदवी दिली.
शेंगदाण्यापासून त्यांनी 105 व टोमॅटो पासून 115 पदार्थ तयार केले. वराह पालन, पशुपालन ,मांस खारवून टिकवणे, जमिनीचा कस वाढवून टिकवणे असे एक ना अनेक उपाय करून यांनी शेतकऱ्यांच्या अंगणात गंगा अवतरवली. रताळ्या पासून तर 125 उपयुक्त वस्तू तयार केल्या उदाहरणार्थ पीठ, स्टार्च ,खाद्यपदार्थ, कापड ,रेशीम, रंग ,विनेगार ,शाई ,कृत्रिम रबर इत्यादी. मातीतील विशिष्ट केमिकल वापरून तसेच 29 प्रकारच्या वनस्पतीची पाने ,फळे, खोड, मूळ यापासून 500 प्रकारचे रंग तयार केले.
अल्वा एडिसन यांनाही जॉर्ज कार्व्हर सोबत काम करण्याची अतोनात इच्छा होती. पण कर्मभूमी सोडून यायला कार्व्हर तयार नव्हते .तसेच लाकडाच्या भुशापासून लाद्या बनवण्याची डॉक्टर कार्व्हर यांची पद्धत स्वीकारून उद्योग चालवणाऱ्या एका निर्मात्याने आपली प्रयोगशाळा चालवावी या बदल्यात लठ्ठ पगाराची नोकरी देऊ केली पण त्यांनी ती नाकारली. त्यांच्या या ईश्वरदत्त देणगी बद्दल त्यांनी लोकांकडून कधीच बक्षीस घेतले नाही. त्यांची नजर दृष्ट्याची होती .काळाच्या पुढचं त्यांना दिसत होतं. या जगात टाकाऊ असं काहीच नाही. सारं जपा वेळप्रसंगी त्याचा उपयोग होतो असं प्राध्यापक कार्व्हर नेहमी म्हणत. कामाच्या 46 वर्षात त्यांनी पगारवाढ कधीच घेतली नाही. ऑस्टिन करटीस या त्यांच्या विद्यार्थ्याने शेवटपर्यंत त्यांची सेवा केली. वयाच्या 70 व्या वयापर्यंत ते पहाटे चार वाजता उठून चालायला जात. आपल्या आरोग्याविषयी अतिशय दक्ष असणाऱ्या अशा या महान महात्म्याने अखेरचा श्वास 5 जानेवारी 1943 ला घेतला.
खरंच खूप अप्रतिम असे हे पुस्तक आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन, विकास ,उपयोग ,पुनर्भरण या शाश्वत कृषी संस्कृतीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजान नागरिकांनी हे पुस्तक वाचायलाच हवे. अशी आपणा सर्वांना माझी नम्र विनंती राहील. तसेच राज्याचे कुशल मार्गदर्शक ,उत्तम तंत्रस्नेही आदरणीय डॉक्टर पवार सरांनी मला या पुस्तकाचा रिव्ह्यू लिहिण्यास प्रेरित केल्याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.
वाचक-श्रीमती मुन्ने छाया भानुदास, जि. प .प्राथ. शाळा मिरजगाव मुली. केंद्र -मिरजगाव
No comments:
Post a Comment